Apk Scam Warning Cyber Fraud Alert : अज्ञात नंबरवरून येणाऱ्या संदेशांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या .APK फायलींमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा वाढताना दिसत आहे. नागरिकांना आकर्षक ऑफर्स, पार्सल अपडेट, बँक व्हेरिफिकेशन किंवा सरकारी योजनांचे नाव वापरून अशा फायली पाठवल्या जात आहेत. बहुतेक वेळा पीडित व्यक्ती अनोळखी लिंकवर क्लिक करते आणि त्यानंतर संपूर्ण फसवणुकीची सुरुवात होते.
सायबर तज्ज्ञांच्या मते, या .APK फायली फोनमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर त्या वापरकर्त्याच्या फोनचा कॅमेरा, संपर्क यादी, व्हॉट्सॲप, एसएमएस आणि बँकिंग ऍप्सना परवानगी घेऊन डेटा चोरू शकतात. त्यानंतर फसवणूक करणारे दूरस्थपणे तुमचा फोन नियंत्रित करून तुमच्या बँकेतील पैशांची लुट करू शकतात.
“सावध रहा, सुरक्षित रहा. अज्ञात स्रोतांवरून येणाऱ्या .APK फायली कधीही डाउनलोड करू नका. एक चुकीचा क्लिक तुमचा डेटा आणि पैसे दोन्ही हिरावून घेऊ शकतो,” असा इशारा सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये अलीकडे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद वाढत असून सायबर विभागाकडून नागरिकांना सतत जागरूक राहण्याचे आवाहन केले जात आहे. बँक, सरकार किंवा कोणतेही अधिकृत कार्यालय कधीही .APK फाइलद्वारे व्हेरिफिकेशन किंवा अपडेट मागत नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आपल्या फोन, व्हॉट्सॲप वर संशयास्पद लिंक येताच ती त्वरित डिलीट करावी, आवश्यक असल्यास सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचा Sangli Today वर.
हेही वाचा : महाराष्ट्रातील विधवा महिलांना दरमहा ₹१५०० देणारी योजना, अर्ज करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक.
