मुंबई : राज्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणींचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबरऐवजी आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे. अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. असे आवाहन महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.
Ladki Bahin Yojana ई-केवायसी कशी पूर्ण करावी?
लाभार्थी महिला फक्त काही मिनिटांत घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in उघडा.
होमपेज वरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा, नंतर ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
सिस्टम तुमचा ई-केवायसी आधीच पूर्ण झाला आहे का ते तपासेल.
पूर्ण असल्यास, ई-केवायसी दिसेल.
जर तुमचा आधार पात्र यादीत नसेल, तर एक संदेश दिसेल: “तुमचा आधार या योजनेसाठी पात्र यादीत नाही.”
ओटीपी आल्यावर तो प्रविष्ट करा.
पुढे, तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करा, कॅप्चा भरा, संमती द्या आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
त्यांच्या मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.
नंतर निवडा: जात श्रेणी, दोन घोषणा (होय/नाही), कुटुंबात कोणताही सरकारी कर्मचारी/पेन्शनधारक नाही आणि कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे.
सबमिशन केल्यानंतर, एक संदेश दिसेल: “यशस्वी.”
तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.

