Ladki Bahin Yojana : वडील आणि पती नसलेल्या लाभार्थी महिलांसाठी शासनाची मोठी सवलत; ई-KYC साठी ३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ कागदपत्रे जमा करावी लागणार

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
2 Min Read
Ladki Bahin Yojana Ekyc Special Facility Documents Deadline

Ladki Bahin Yojana Ekyc Special Facility Documents : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक लाभार्थी महिलांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्या महिलांचे वडील किंवा पती दोघेही हयात नाहीत, त्या महिलांकडे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने KYC पूर्ण करणे कठीण झाले होते. शासनाने या तक्रारीची दखल घेत आता अशा लाभार्थींसाठी विशेष सवलत सुविधा लागू केली आहे.

वडील व पती नसलेल्या लाभार्थी महिलांना विशेष दिलासा

नवीन निर्णयानुसार, ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, घटस्फोट झाला आहे किंवा त्या एकल/निराधार आहेत, त्या आपली ई-KYC पूर्ण करून वडील किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश यांची प्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करू शकतात.

यानंतर अंगणवाडी सेविका प्रमाणपत्रांची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक न देता ई-KYC करण्यास परवानगी मिळावी अशी शिफारस CDPO मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत.

शासनाकडून सूट देण्यावर अंतिम निर्णय

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुढे ही शिफारस आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवतील. त्यानंतर पात्र महिलांना ई-KYC मधील सवलत मंजूर केली जाईल.
महिला व बालविकास विभागाने अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबरपूर्वी कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

ई-KYC वेळेत न केल्यास हप्ता अडचणीत

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-KYC अनिवार्य असल्याने, प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास पुढील महिन्यांचे हप्ते थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी मुदतवाढीचा फायदा घेत निर्धारित कालावधीत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख