Mahila Samridhi Yojana : महिलांसाठी सरकारची कमी व्याजदराची कर्जसहाय्य योजना

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
2 Min Read
Mahila Samruddhi Yojana Maharashtra Details Eligibility

Mahila Samridhi Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकारने चर्मकार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राबविलेली “महिला समृद्धी योजना” पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत प्रशासित ही योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (NSFDC) द्वारे निधीतून चालविली जाते.


महिला समृद्धी योजनेचा लाभ चर्मकार समाजातील (धोर, चांभार, होलार, मोची इ.) महिलांना दिला जातो. त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास साधून त्यांना समाजात सन्माननीय स्थान मिळावे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


कमी व्याजदरात ₹५०,,००० पर्यंत कर्ज


या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वार्षिक फक्त ४% इतक्या कमी व्याजदराने ₹२५,००० ते ₹५०,००० पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कोणताही छोटा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी हे कर्जसहाय्यता महिलांसाठी मोठा हातभार ठरत आहे.


महिला समृद्धी योजनेसाठी कोण पात्र?


महिला समृद्धी योजनेसाठी खालील निकष लागू आहेत:

  • अर्जदार महिला असावी.
  • अर्जदार महिला चर्मकार समाजातील असावी.
  • महिलेचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
  • महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणे आवश्यक.
  • महिलेस संबंधित व्यवसायाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे.
  • ५०% अनुदान व मार्जिन मनी योजनेकरिता कुटुंबाचे उत्पन्न दारिद्र्यरेषेखाली असणे आवश्यक.
  • NSFDC कर्ज योजनांसाठी ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न ₹98,000 पेक्षा कमी आणि शहरी भागासाठी ₹1,20,000 पेक्षा कमी असावे.

या योजनेत विधवा आणि घटस्फोटित महिलांना प्राधान्य दिले जाते.


महिला समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया


महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने आहे.

  • इच्छुक महिलांनी ऑफिस वेळेत LIDCOM जिल्हा कार्यालयाला भेट देऊन अर्जाची हार्ड कॉपी घ्यावी.
  • अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून, पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा व अनिवार्य कागदपत्रे जोडावीत.
  • पूर्ण फॉर्म व कागदपत्रे LIDCOM कार्यालयात विहित कालावधीत जमा करावीत.
  • अर्ज सादर केल्याची पावती/पोचपावती घ्यावी आणि त्यावरील क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवावा.

अर्जासोबत उत्पन्न प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र (सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेले) सादर करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: लाडकी बहीण योजना ई-केवायसी पूर्ण करू शकत नसाल, तर ही पद्धत वापरा.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख