National Family Benefit Scheme | नवी दिल्ली : अचानक कुटुंबाचा कर्ता व्यक्ती निधन पावला आणि घरावर आर्थिक संकट कोसळले, तर केंद्र सरकारची ‘National Family Benefit Scheme (NFBS)’ गरीब कुटुंबांसाठी दिलासा ठरू शकते. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या National Social Assistance Programme (NSAP) अंतर्गत ही योजना चालवली जाते आणि मृत्यूचे कारण काहीही असले तरी कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत दिली जाते.
काय आहे National Family Benefit योजना?
घरातील प्राथमिक कमावत्या व्यक्तीचे (कर्ता व्यक्ती) वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असताना निधन झाल्यास, सरकार ₹20,000 ची एकरकमी मदत कुटुंबातील प्रमुख सदस्याला देते. ही मदत गरीबी रेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी उपलब्ध आहे.
कोणाला मिळतो लाभ?
अर्जदार भारतीय नागरिक असावा
कुटुंब BPL सूचीमध्ये असावे
मृत व्यक्ती हा कुटुंबाचा मुख्य कमावता सदस्य असावा
मृत व्यक्तीचे वय मृत्युवेळी 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे
अर्जदार हा कुटुंबाचा पुढचा प्रमुख सदस्य असावा
अर्ज कसा करायचा?
ऑफलाइन पद्धत:
अर्ज फॉर्म NSAP च्या मार्गदर्शक सूचनांमधील Annexure-III मधून डाउनलोड करा (दुवा: nsap.nic.in/Guidelines/nsap_guidelines_oct2014.pdf).
भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे Tehsil Social Welfare Officer (TSWO) किंवा District Social Welfare Officer (DSWO) यांच्याकडे जमा करा.
तपासणी झाल्यानंतर प्रकरण ब्लॉक कमिटीमार्फत जिल्हा समितीकडे जाते आणि मंजुरी मिळाल्यानंतर मदत थेट खात्यात जमा केली जाते.
ऑनलाइन पद्धत:
UMANG App किंवा web.umang.gov.in वर लॉगिन करा
NSAP सेवा शोधा → Apply Online
माहिती भरा, फोटो अपलोड करा आणि सबमिट करा.
हेही वाचा: 2,000 रुपये खात्यात आले नाहीत? येथे करा तक्रार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
कोणती कागदपत्रे लागतात?
मृत व्यक्तीची कागदपत्रे::
- मृत्यू प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- BPL/Ration कार्ड
- Family ID / Member ID
मदत मिळणाऱ्या सदस्याची कागदपत्रे:
- ओळखपत्र
- पत्ता पुरावा
- वयाचा पुरावा
- Family ID / Member ID
- आधार लिंक असलेले बँक/पोस्ट खाते
- पासपोर्ट फोटो
केंद्र सरकारची ही योजना देशातील गरीब कुटुंबांना कठीण काळात तातडीचा आर्थिक हातभार देत आहे. अर्ज प्रक्रिया सोपी असल्याने, ग्रामीण आणि शहरी गरीब कुटुंबांना ही मदत वेगाने मिळते.

