Ladki Bahin Yojana 3000 Rupees Update : महाराष्ट्रातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात लाभार्थींच्या खात्यात फक्त १५०० नव्हे तर ३००० रुपये जमा करू शकते, अशी माहिती शासनवर्तुळातून समोर येत आहे.
यामागच कारण म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थींना मिळालेला नाही, आणि त्यामुळे सरकार नोव्हेंबर + डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नोव्हेंबरचा हप्ता अजून का आला नाही? निवडणुकांचा परिणाम?
राज्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आचारसंहितेमुळे अनेक आर्थिक व्यवहारांवर मर्यादा लागू होतात. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता विलंबित झाल्याची शक्यता अधिक दिसते.
अर्थात, ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विधानसभा निवडणुकांच्या काळात दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही सरकार पुढील आठवड्यात दोन्ही हप्ते एकत्रित जमा करू शकते.
३००० रुपये एकाच वेळी जमा होण्याची शक्यता?
नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाही
डिसेंबर महिना सुरू झाला आहे
निवडणुका नुकत्याच संपल्या
यापूर्वीप्रमाणे दोन महिन्याचे हप्ते एकत्र जमा केले जाऊ शकतात
या सर्व कारणांमुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० + १५०० = ३००० रुपये जमा होण्याची शक्यता अधिक आहे.
ई-KYC पूर्ण नसल्यास पैसे अडकू शकतात
शासनाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की ई-KYC पूर्ण नसलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून त्याआधी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
घरबसल्या ई-KYC करा
वेबसाइटला भेट द्या:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in
Home Page वरील e-KYC बॅनरवर क्लिक करा
आपला आधार क्रमांक + कॅप्चा कोड भरा
“I Agree” करून Send OTP करा
आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP भरून Submit करा
जर तुमचे e-KYC आधीच पूर्ण झाले असेल तर सिस्टम स्वतःच “e-KYC Completed” असा संदेश दाखवेल.
लाडक्या बहिणींना एकच प्रश्न — पैसे कधी येणार?
प्रशासनाकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पुढील ७ दिवसांत:
नोव्हेंबरचा प्रलंबित हप्ता आणि डिसेंबरचा मासिक हप्ता एकत्रितरीत्या जमा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच अनेक स्रोतांनुसार, या महिन्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.

