पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठे बदल घडवत असून या बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ब्रिजेश सिंह यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या कार्यशाळेत ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला.
ब्रिजेश सिंह म्हणाले की, AI हे पत्रकारितेतील वेग वाढवणारे प्रभावी साधन आहे. माहिती संकलन, भाषांतर आणि विविध प्लॅटफॉर्मवर सादरीकरण यासाठी AI चा उपयोग करून कामाची गुणवत्ता सुधारता येते. त्यामुळे पत्रकारांना विश्लेषणात्मक आणि संशोधनात्मक कामासाठी अधिक वेळ मिळतो.
सांगलीत सोशल मीडिया मार्केटिंग करायचय : Social Media Marketing Agency in sangli आहेच ना
मात्र, AI हे मानवी संदर्भांवर आधारित असल्याने त्यात चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे AI वापरताना तथ्यांची अचूकता तपासणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला पत्रकारांनी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरते मर्यादित न राहता गुन्हे, राजकारण आणि इतर क्षेत्रांतही AI चा वापर करून प्रभावी वार्तांकन करावे, असे आवाहन त्यांनी केले. बदलत्या काळात आघाडीवर राहण्यासाठी तांत्रिक कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रादेशिक भाषांमध्ये AI चा वापर वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. ‘इंडिक AI’ टूल्समुळे ग्रामीण भागातील माहिती स्थानिक भाषेत सहज पोहोचवणे शक्य होत असून त्यामुळे माहितीचा प्रसार अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
AI वापरासोबत नैतिक नियमावलीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, युरोपमध्ये अशा नियमांची अंमलबजावणी सुरू आहे आणि भारतातही अशा प्रकारची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत.
या कार्यशाळेत महिला पत्रकारांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: राज्यात 20 ते 24 एप्रिल वादळी पाऊस व गारपीटचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

