महाराष्ट्रात वीज महागली: उद्योग-व्यवसायांवर अतिरिक्त कर; सरकारचा पैसा ‘या’ योजनेसाठी वापरणार

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Maharashtra Electricity Charge Increase Industry Tax

राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान महाराष्ट्र सरकारने वीजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वीज विक्रीवरील करात वाढ करण्यात आली असून याचा थेट परिणाम औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर होणार आहे. प्रतियुनिट तब्बल 9.90 पैशांनी कर वाढवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांवर थेट परिणाम होणार नसला, तरी उद्योग आणि व्यवसायांना वाढीव वीजबिलाचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी औद्योगिक ग्राहकांसाठी विक्रीकर 19.04 पैसे प्रति युनिट होता, तो आता 28.94 पैसे करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी 18.00 पैशांवरून 27.90 पैसे प्रति युनिट असा वाढीव दर लागू करण्यात आला आहे.

राज्याची ‘औद्योगिक राज्य’ ही ओळख धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या वीजदरांमुळे उद्योग अन्य राज्यांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मत ऊर्जातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या वाढीव करातून मिळणारा निधी राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला मदत होणार असली, तरी उद्योगांवर आर्थिक ताण वाढणार आहे.

याआधीच ग्रिड सपोर्ट चार्ज आणि इतर नियमांमुळे उद्योगांचे वीजबिल वाढले असताना, आता नव्या करवाढीमुळे उद्योजकांवर आणखी भार पडणार आहे. त्यामुळे उद्योगांचे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सेवा ठप्प होण्याची शक्यता.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख