अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यात 13 बालविवाह रोखले; महिला व बालविकास विभागाची मोठी कारवाई

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
2 Min Read
Akshay Tritiya 13 Child Marriages Prevented Maharashtra

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यस्तरीय आढावा बैठक घेऊन सर्व जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन 1098, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पथनाट्य, पोस्टर, पदयात्रा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

बालविवाहाचे कायदेशीर परिणामही नागरिकांना समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षांखाली किंवा मुलाचे वय २१ वर्षांखाली असल्यास विवाह लावणाऱ्या व्यक्तींवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून रायगड, अहिल्यानगर, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण १३ बालविवाह रोखण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

महिला व बालविकास विभागाच्या समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरोधात समाजात ठोस संदेश गेला असून भविष्यातही अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचा: पत्रकारितेत AIचा प्रभाव वाढतोय; महिला पत्रकारांनी तंत्रज्ञान स्वीकारावे – ब्रिजेश सिंह.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख