महाराष्ट्र सरकारचे 1600 कोटींचे 18 वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस; 21 एप्रिलला लिलाव

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
2 Min Read
Maharashtra Government Bonds 1600 Crore Auction

महाराष्ट्र शासनाने 18 वर्ष मुदतीचे 1,600 कोटी रुपयांचे कर्जरोखे (Government Bonds) विक्रीस काढले आहेत. या रोख्यांमधून मिळणारा निधी राज्यातील विविध विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी दिली.

या कर्जरोख्यांचा लिलाव 21 एप्रिल 2026 रोजी Reserve Bank of India (RBI), मुंबई येथे होणार आहे. बोली प्रक्रिया ई-कुबेर (e-Kuber) प्रणालीद्वारे पार पडणार आहे.

स्पर्धात्मक बिड्स सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत, तर अस्पर्धात्मक बिड्स 10:30 ते 11:00 या वेळेत सादर करता येणार आहेत. लिलावाचा निकाल त्याच दिवशी RBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार एकूण रकमेपैकी 10% हिस्सा पात्र वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

मात्र, एका गुंतवणूकदाराला एकूण रकमेच्या जास्तीत जास्त 1% पर्यंतच वाटप मिळू शकते.यशस्वी बोलीदारांनी 22 एप्रिल 2026 रोजी रक्कम जमा करणे आवश्यक आहे. हे कर्जरोखे 22 एप्रिल 2026 पासून लागू होतील आणि 22 एप्रिल 2044 रोजी पूर्ण किमतीने परतफेड केली जाईल.या रोख्यांवर व्याज दर लिलावात निश्चित केला जाईल आणि सहामाही पद्धतीने दरवर्षी 22 एप्रिल व 22 ऑक्टोबर रोजी व्याज दिले जाईल.

शासकीय रोख्यांमध्ये बँकांची गुंतवणूक ही SLR (Statutory Liquidity Ratio) पूर्ण करण्यासाठी पात्र मानली जाईल. तसेच हे रोखे बाजारात खरेदी-विक्रीसाठीही उपलब्ध असतील.

हेही वाचा: नारी शक्ती वंदन अधिनियम: महिलांना 33% आरक्षण, लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख