राज्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या 50 शाखा उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.
Ratan Tata Maharashtra State Skill University च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, सिंगापूरच्या कौशल्य शिक्षण मॉडेलच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना 100 टक्के रोजगार मिळेल, अशा पद्धतीने प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देण्यात येत असून राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत 3 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत 2 लाख उद्योजक घडवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच 50 हजार स्टार्टअप्स उभारण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. राज्यातील 417 आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य विकासाला गती दिली जाणार आहे.
सिंगापूरच्या शिक्षण आणि तंत्रज्ञानावर आधारित मॉडेलचा आदर्श घेत महाराष्ट्रातही रोजगारकेंद्रित शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा: महिला सुरक्षेसाठी नगरविकास विभागाने स्वतंत्र प्रणाली विकसित करावी – डॉ. नीलम गोऱ्हे.

