Election 2026 Media Rules: माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियम; मतदान केंद्रांवर ID अनिवार्य

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Election 2026 Media Rules India

आगामी सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग यांनी माध्यम प्रतिनिधींसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र (ID) अनिवार्य करण्यात आले आहे.

आयोगाच्या निर्देशानुसार, मतदान केंद्रांवर माध्यम प्रतिनिधींचा प्रवेश निवडणूक नियम, 1961 च्या तरतुदींनुसार केंद्राध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असेल. फक्त अधिकृत परवानगी असलेल्या पत्रकारांनाच कव्हरेजची मुभा दिली जाईल.

माध्यम प्रतिनिधींना परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या पत्र माहिती कार्यालय (PIB) किंवा राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक असेल. अर्जांची सखोल तपासणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, अधिकृत मान्यता मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना ‘अत्यावश्यक सेवा’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले असून त्यांना टपाल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क दिला जाणार आहे.

मतदान केंद्रांवर वार्तांकन करताना गोपनीयतेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. कोणत्याही पत्रकाराला मतदान कक्षात जाऊन फोटो किंवा व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रतिनिधीवर कारवाई करून त्यांचे अधिकृत परवाने रद्द केले जातील.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: अक्षय्य तृतीया 2026: बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक कारवाई; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख