Maharashtra Weather Alert: 20–22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Maharashtra Weather Alert Storm Rain April

राज्यात 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता आहे.

19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट भाग, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात वादळी पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभागातही पावसाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. 22 एप्रिल रोजी मात्र पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.

या संभाव्य हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच शेतमाल आणि भाजीपाला उघड्यावर ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: शाळांना गणवेश-पुस्तक खरेदीसाठी सक्ती करता येणार नाही; शिक्षण विभागाचा आदेश.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख