गाजीपूर अपघातातील जखमींची प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; बुलढाणा रुग्णालयात तब्येतीची चौकशी

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Prataprao Jadhav, Buldhana News, Accident News, Maharashtra News, Hospital Visit,

उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक रुग्णालयात भेट देत उपचार सुरू असलेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली.

मोताळा तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी जात असताना 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील नंदगज परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलविण्यात आले.

जाधव यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच इतर रुग्णांशीही संवाद साधत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.

रुग्णालय भेटीनंतर त्यांनी रोहीणखेड येथे अपघातात मृत्यू झालेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमी भानुदास हुंबड आणि नलिनी हुंबड यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

हेही वाचा: कोल्हापूर भूमी अभिलेख ‘हायटेक’; 3.69 कोटींच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण, मोजणी कामाला वेग.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख