महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिलेल्या माहितीनुसार, आता उमेदवारांना 24 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 16 एप्रिल 2026 होती. मात्र, अनेक उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. उमेदवारांनी ही अतिरिक्त मुदत लक्षात घेऊन वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Alert: 20–22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा.

