Shravan Bal Yojana : दरमहा ₹1500 मिळणार! निराधार ज्येष्ठांसाठी ‘श्रावण बाळ’ योजना; काय आहे?

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Shravan Bal Yojana 1500 Pension Maharashtra

Shravan Bal Yojana : राज्यातील निराधार आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार ठरणारी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना पुन्हा चर्चेत आली आहे. वृद्धापकाळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दरमहा थेट मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना 65 वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन थेट बँक खात्यात जमा केले जाते, त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. नागरिकांना आता ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात जाऊनही अर्ज सादर करता येतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा होते.

या योजनेसाठी कोण पात्र?

65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिक

आवश्यक कागदपत्रे:

वयाचा पुरावा (किमान 65 वर्ष)

महाराष्ट्रातील 15 वर्षांचा रहिवासी दाखला

आधार कार्ड / रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र

बँक पासबुक झेरॉक्स

उत्पन्न दाखला (वार्षिक मर्यादा ₹21,000)

अर्जदाराचा फोटो

BPL तसेच नॉन-BPL नागरिकही अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करावा?

तहसील कार्यालयातील सेतु केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करता येतो:

ऑनलाईन अर्ज 👉 https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.in अनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.” कार्यक्षेत्र (Areas of Focus) सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंक GR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरण सरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहिती कृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावा शिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवा संपादकीय दृष्टी (Editorial Vision) > “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख