PM Kisan Yojana 21st Installment Not Received | नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता केंद्र सरकारने अधिकृतरीत्या जारी केला असून देशभरातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये DBT मार्फत जमा झाले आहेत. तामिळनाडूतील कोयंबटूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 18,000 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला.
अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले असले, तरी काही लाभार्थ्यांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असूनही पिएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल, तर पुढील मार्गांनी तुम्ही त्वरित संपर्क साधून कारण जाणून घेऊ शकता.
कुठे कराल संपर्क?
पैसे न मिळालेले शेतकरी अधिकृत ई-मेल
pmkisan-ict@gov.in
या ई-मेलवर संपर्क साधू शकतात.
याशिवाय सरकारने हेल्पलाइन नंबरही उपलब्ध करून दिले आहेत:
📞 155261
📞 1800-11-5526 (Toll Free)
📞 011-23381092
या क्रमांकांवर कॉल करून तुमची समस्या नोंदवता येईल आणि हप्त्याबाबतची माहिती मिळेल.
हेही वाचा: मुसळधार पाऊस आणि वन्य प्राण्यांमुळे झालेले पीक नुकसान भरपाई मिळणार; पण एक महत्त्वाची अट लागू.
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? असे तपासा
- अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- ‘Farmers Corner’ मध्ये Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून तुमच्या हप्त्याची स्थिती तपासा.
जर नोंदणी क्रमांक माहित नसेल तर ‘Know Your Registration Number’ वर क्लिक करून आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे तो मिळवता येऊ शकतो.
कॅप्चा आणि OTP भरल्यानंतर तुम्हाला तुमचा हप्ता का अडकला आहे याची संपूर्ण माहिती दिसेल.
21वा हप्ता खात्यात न येण्याची मुख्य कारणे
eKYC पूर्ण नसणे.
बँक खात्याशी संबंधित चुकीची माहिती दिलेली असणे.
आधार आणि बँक खात्याचा तपशील जुळत नसणे.
नोंदणी करताना चुकीचा खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक भरला जाणे.
तपशील दुरुस्त झाल्यानंतर पुढील हप्त्यात तुमची रक्कम नियमितपणे जमा होईल.
देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या PM-KISAN योजनेतून आतापर्यंत कोट्यवधी कुटुंबांना थेट आर्थिक लाभ मिळाला आहे.

