Ladki Bahin Yojana Beneficiary List: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे 70 ते 80 लाख महिलांचा 1500 चा मासिक लाभ बंद होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
राज्यात पात्र महिलांना दर महिन्याच्या 10 तारखेला ₹1500 मदत दिली जाते. मात्र, अनेक अपात्र लाभार्थी समोर आल्यामुळे सरकारने ई-केवायसी सक्तीची केली होती. 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिल्यानंतरही दुरुस्तीसाठी आणखी वेळ देण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी आहे. त्यानंतर निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.
यामुळे 1 मे 2026 पासून अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होणे बंद होऊ शकते. जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता न मिळालेल्या महिलांनी आपली पात्रता आणि यादीतील नाव तातडीने तपासणे गरजेचे आहे.
