PM Kisan योजनेत मोठा बदल! 23वा हप्ता मिळवायचा असेल तर Farmer ID अनिवार्य; कस काढायच?

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
PM Kisan Yojana Farmer ID Mandatory 23rd Installment Maharashtra

PM Kisan Farmer ID Mandatory : पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी नवा नियम लागू झाला आहे. 23वा हप्ता मिळण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला असून आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 दिले जातात. आतापर्यंत 22 हप्ते वितरित झाले असले तरी पुढील हप्त्यापूर्वी पडताळणीची प्रक्रिया कडक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याआधी काही राज्यांपुरता मर्यादित असलेला हा नियम आता देशभर लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम आदी राज्यांतील शेतकऱ्यांसाठी Farmer ID बंधनकारक करण्यात आला आहे.

फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकरी ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकतात. आधार क्रमांक आणि मोबाईल ओटीपीद्वारे लॉगिन करून वैयक्तिक माहिती, केवायसी आणि शेतीची माहिती भरल्यानंतर नोंदणी पूर्ण होते.

सरकारच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांची अचूक पडताळणी होणार असून बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. मात्र, Farmer ID न काढल्यास पुढील हप्ता अडकण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

दरम्यान, पुढील 23वा हप्ता कधी जमा होणार याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.in अनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात. त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.” कार्यक्षेत्र (Areas of Focus) सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंक GR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरण सरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहिती कृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावा शिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवा संपादकीय दृष्टी (Editorial Vision) > “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख