Leopard Attack: महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या हल्ल्यांमुळे शाळांच्या वेळांत बदल, रेस्क्यू सेंटरची उभारणी

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Maharashtra Leopard Attacks School Timings Changed Rescue Centres Update

Maharashtra Leopard Attack : महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारने तातडीच्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषतः उसपट्ट्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

प्रभावित भागातील शाळा आता 9.30 ते 4 वाजेपर्यंत

बिबट्या हल्ले जास्त असलेल्या भागातील शाळांच्या वेळात बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांत अनेक नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केले असून, ग्रामीण भागात संताप वाढलेला आहे, काही ठिकाणी रस्ते रोखण्याचे प्रकारही घडले आहेत.

रेस्क्यू सेंटर आणि उपकरणांसाठी निधी

राज्य सरकारने बिबट्यांचे हल्ले वाढलेल्या भागांमध्ये पिंजरे, आवश्यक उपकरणे आणि पकड मोहीम राबवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.
बैठकीनंतर अजित पवार यांनी सांगितले की, “राज्यात दोन विशेष बिबट्या रेस्क्यू सेंटर उभारण्याची योजना सुरू आहे. पकडलेल्या बिबट्यांना या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.”

हेही वाचा: लाडकी बहीण योजना ई-केवायसी पूर्ण करू शकत नसाल, तर ही पद्धत वापरा.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख