Ladki Bahin Yojana Ekyc Update Maharashtra: नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होणार कि नाही?

Maha24.in icon
अनिकेत देशमुख - संपादक, Maha24.in
1 Min Read
Ladki Bahin Yojana Ekyc Update Maharashtra

Ladki Bahin Yojana Ekyc Update Maharashtra : राज्यातील महिलांसाठी राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेतुन पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का, याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या या योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, आधीच अर्ज केलेल्या महिलांसाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. काही लाभार्थींनी eKYC करताना चुका केल्याचे आढळल्याने शासनाने दुरुस्तीची संधी दिली आहे. संबंधित महिलांना 30 एप्रिलपर्यंत eKYC अपडेट करण्याची मुदत देण्यात आली आहे.

eKYC प्रक्रियेदरम्यान फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. जळगाव येथे eKYC करून देण्याच्या नावाखाली एका महिलेसोबत गैरवर्तन झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नये, आमिषांना बळी पडू नये आणि eKYC प्रक्रिया स्वतः मोबाईलवरून किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेच पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये; लगेच करा हे काम.

Share This Article
Maha24.in icon
संपादक, Maha24.in
Follow:
अनिकेत देशमुख — Editor-in-Chief, Maha24.inअनिकेत देशमुख हे Maha24.in चे Editor-in-Chief असून, महाराष्ट्रातील सरकारी योजना, सरकारी निर्णय (GR/परिपत्रके) आणि नोकरी/भरती या विषयांवरील संपादकीय दिशादर्शन ते पाहतात. दहाहून अधिक वर्षांच्या डिजिटल पत्रकारिता आणि डेटा-रिसर्च अनुभवासह, अनिकेत गुंतागुंतीची सरकारी माहिती—अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आणि अधिकृत अद्ययावत—सोप्या, अचूक आणि विश्वासार्ह मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांचा भर अचूकता, स्रोत-पडताळणी आणि पारदर्शकता यांवर असतो—म्हणूनच Maha24.in वर प्रकाशित प्रत्येक लेख अधिकृत दस्तऐवज, सरकारी वेबसाइट्स, GR आणि परिपत्रकांवर आधारित असतो. अनिकेत मानतात की “सरकारी माहिती वेळेवर आणि स्पष्ट पोहोचली तरच नागरिकांना त्याचा खरा लाभ होऊ शकतो.”कार्यक्षेत्र (Areas of Focus)सरकारी योजना: अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ व अधिकृत लिंकGR, Circulars व धोरणात्मक निर्णयांचे स्पष्टीकरणसरकारी नोकरी/भरती: जाहिराती, तारखा, पात्रता व मार्गदर्शक माहितीकृषी व ग्रामीण विकास योजनांचा आढावाशिक्षण/शिष्यवृत्ती आणि नागरिकांसाठी उपयुक्त सेवासंपादकीय दृष्टी (Editorial Vision)> “सरकारी निर्णय लोकांपर्यंत अचूक, सोप्या भाषेत आणि वेळेवर पोहोचवणे—यातूनच माहितीचा खरा लोकशाही अर्थ पूर्ण होतो.” — अनिकेत देशमुख